टोकियो – भारताची अनुभवी थाळीफेक प्रकारातील खेळाडू कमलप्रीत कौरने चांगले प्रयत्न केले. मात्र, तिला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
ऍथलेटिक्समधील पहिले पदक कमलप्रीतच्या रूपाने मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. यंदाच्या स्पर्धेत कमलप्रीतने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
मात्र, सहा प्रयत्नांत 63.70 मीटर इतकेच अंतर तिला नोंदवता आले व तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे ऍथलेटिक्समधील पहिल्या पदकाची अपेक्षाही संपली.
2019 साली दोहा येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती पाचव्या स्थानावर होती. 2019 सालच्याच स्पर्धेत तिने 60.25 मीटर अंतर नोंदवताना टोकियोची पात्रता मिळवली होती.