नवी दिल्ली – जपानमध्ये नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवत सहाव्या स्थानावर राहिलेली भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौर डोपींग चाचणीत दोषी आढळली आहे.
तीच्या तपासणीत व चाचणीत तिच्या शरिरामध्ये स्टॅनोझोलोल या बंदी असलेल्या ऍनाबोलिक स्टेरॉईडचे अशं सापडले आहेत. त्यामुळे नमुना ब चाचणीपर्यंत तीच्यावर तात्पूरती बंदी लावण्यात आली आहे.
कमलप्रीत भारतीय अॅथलेटिक महासंघाच्या शिबिरात सहभागी झाली असून तिचा समावेश ऑलिम्पिक पोडियम योजनेतही करण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील ट्रॅक अँड फिल्डमधील एक पुरुष तर एक महिला खेळाडू डोपिंग चाचणीत सापडल्याचे संकेत मिळाले होते. त्यात भारताच्या कमलप्रीत कौरचे नाव आले होते.