मृत्यू कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी नाही

"एम्स'मधील चाचण्यांच्या विश्‍लेषणाचा निष्कर्श

नवी दिल्ली – करोनाच्या संसर्गानंतर होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा विशेष उपयोग नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे. “एम्स’मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्शांच्या आधारे ही उपचार पद्धती विशेष उपयोगाची नसल्याचा हंगामी निष्कर्श काढण्यात आला आहे. 

या उपचार पद्धतीतून करोनामुक्‍त झालेल्या व्यक्‍तीच्या शरीरातील रक्‍तातून ऍन्टीबॉडीज वेगळ्या करून त्या सक्रिय करोनाबाधित रुग्णाच्या शरीरात सोडल्यास ऍन्टीबॉडीजच्या प्रतिकारक क्षमतेचा फायदा बाधिताला त्वरित मिळू शकत असल्याचे मानले जाते. मात्र कोविड-19 बाधित 30 रूग्णांमधील चाचणी दरम्यान प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूदर घटल्याचे स्पष्टपणे आढळले नाही, असे “एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. 

या चाचणीदरम्यान रुग्णांच्या एका गटाला नियमित उपचारांबरोबर प्लाझ्मा देण्यात आला. तर दुसऱ्या गटाला केवळ नियमित उपचारच देण्यात आले. मात्र दोन्ही गटांमध्ये मृत्यू दर सारखाच नोंदवला गेला. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा बघायला मिळाली नाही, असे ते म्हणाले.

अर्थात प्लाझ्मा थेरपीबाबतचा हा केवळ हंगामी अहवल आहे. या संदर्भात अधिक तपशीलवार विश्‍लेषण करणे गरजेचे आहे. प्लाझ्मा उपचार पद्धतीचा कोणत्याही उपगटाला काही फायदा होऊ शकतो का, हे तपासून पहावे लागेल. असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.