रेडा -इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपती कदम विद्यालयाच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर देहू संस्थानाचे अध्यक्ष हभप माणिक मोरे आणि सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
इंदापूर नगरपरिषदेने तयार केलेल्या अटल आनंदघन वन योजनेंतर्गत वीस गुंठा जागेमध्ये लावलेल्या दोन हजार झाडांची पाहणी सयाजी शिंदे यांनी केली. इतर ठिकाणीही आनंद अटल वनसारखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सयाजी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पालखी तळावर 14 झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षप्रेमी रघुनाथ ढोले, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक जगदीश मोहिते, यावेळी उपस्थित होते.