पिंपरी : इलेक्ट्रॉनिक्स उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चिंचवड येथील सुर्या इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रमेश चौधरी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ‘पुणे अचिव्हर्स 2023’ अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे अचिव्हर्स 2023’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संघटक विश्वास भोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, उद्योजक सागर अग्रवाल, संतोष बारणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रमेश चौधरी यांचा एक हेल्पर ते उद्योजक असा खडतर प्रवास आहे. परराज्यातून येऊन पुण्यासारख्या शहरात त्यांनी सुर्या इलेक्ट्रॉनिक्स नावाने पुणे जिल्ह्यात 11 दालने जनतेच्या सेवेत कार्यरत केली आहे. आज 200 पेक्षा अधिक कामगारांच्या हाताला काम दिले. एक यशस्वी उद्योजकासोबत ते सामाजिक कार्यात सहभागी होतात. त्यासोबत आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासनांचे व्याख्याने देतात. निष्ठेने ग्राहकसेवा, ऑनलाईनपेक्षा स्वस्त उपकरणे उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक व्यवहार यामधून सुर्या इलेक्ट्रॉनिक्स हा इलेक्ट्रॉनिक्स विक्री दालनात जनतेच्या प्रेमातून घडलेला ब्रॅंड असल्याचे ते म्हणाले.