हिंजवडी येथे तरुणीचा विनयभंग

पिंपरी – आपल्या दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या तरुणीचा चालत्या मोटारीतूून हात पकडून विनयभंग केल्याची घटना हिंजवडी परिसरात शुक्रवार दि. 29 रोजी घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन मोटारीतील दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फियार्दी 26 वर्षीय तरुणीही शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिजंवडी परिसरातून तिच्या दुचाकीवरुन घरी परतत होती. दरम्यान दोन आरोपींनी (एमएच 14 सीके 2357) चारचाकी मोटारीतून तरुणीच्या जवळ आले. व मागील बाजूस बसलेल्या तरुणाने काचेतून हात बाहेर काढून तिचा हात पकडून विनयभंग केला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि देवताळे हे करीत आहेत. हिंजवडी परिसरात विनयभंगाचे गुन्हे वाढत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.