मानकोट आणि कृष्णा घाटीत ‘पाक’कडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन; एका भारतीय सैनिकास वीरगती

पाकीस्तानकडून आज मानकोट आणि कृष्णा घाटी परिसरामध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकतर्फे करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारताचे ५ सैनिक जखमी झाले असून जखमींपैकी एका जवानास उपचारादरम्यान वीरगती प्राप्त झाली आहे.

मानकोट आणि कृष्णा घाटी हे जम्मू काश्मिरातील पूंच जिल्ह्यामध्ये असून सीमेनजीक असलेल्या या भागावर आज पाकिस्तानतर्फे जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये एक पाच वर्षीय लहानगीचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.