लेखी आश्‍वासनानंतर शिवसेनेचा रास्ता रोको स्थगित

नगर – स्थलांतरासाठी पाइपलाइनचे अंदाजपत्रक एएसआरडीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपासून पाइपलाइन स्थलांतराचे काम सुरू करण्यात येईल. तसेच अरणगाव ते कायनेटीक चौक दरम्यानच्या विद्युत वितरण कंपनीचे राहिलेले काम आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर शिवसेनेच्यावतीने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, मंगळवारपर्यंत पाइपलाइनचे काम सुरू न झाल्यास व इतर कामे न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

नगर-दौंड महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या महामार्गाचे काम सरकारने ठरवून दिलेल्या करारनाम्यानुसार होत नाही तसेच अरणगावपासून कायनेटिक चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, खडी, दगड गोटे पडलेले आहेत. याचा जाणाऱ्या येणाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे. रस्त्यावरील दगड गोटे न उचलल्यास शुक्रवारी (3 मे) रोजी अरगणाव येथे रास्ता रोको करून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कार्ले यांनी 30 एप्रिल रोजी दिला होता.

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी अरणगाव ग्रामपंचायत येथे अरणगावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कार्ले, दिनेशचंद्र अगरवाल कंपनीचे प्रतिनिधी जयस्वाल, विजय सिंह, व नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अशी एकत्रित बैठक झाली. बैठकीत अरणगाव ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. शुक्रवारी सकाळी दिनेशचंद्र अगरवाल ठेकेदार कंपनीने लेखी करारनाम्यानुसार रस्त्यांची, पाईपलाईनची, लाईटची कामे करण्याबाबत आश्‍वासन दिल्यानंतर अरणगाव येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.