कार्ला लेणीच्या पायऱ्या उखडल्या, दुरुतीसाठी मनसेच्यावतीने पुरात्व विभागाला निवेदन

कार्ला – श्री आई एकवीरा देवीची यात्रा काही दिवसांवर आली असून, लाखो भाविक यात्राकाळात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणार असून, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. एकवीरा देवीला येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक वसंतराव कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुरात्व विभागाला पायऱ्या दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

कार्ला लेणी, वेहरगाव-कार्ला एकवीरादेवी मंदिर हे एक पर्यटक केंद्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या एकवीरा देवी मंदिर याठिकाणी आहे. पर्यटकांन बरोबर लाखो भाविक भेट देतात. परंतु मागील अनेक दिवसांपासून पायऱ्यांची बिकट अवस्था झाली असून, अनेक पायऱ्या नष्ट झाल्या आहेत.त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
पुरातत्व विभाग लेणी पाहण्यासाठी शुल्क आकारत आहे; परंतु पायऱ्यांच्या दुरुस्तीला वेळ नाही.

12 एप्रिलला देवीच्या पालखी सोहळा आहे. लाखो भाविक हजेरी लावणार आहे. पायऱ्यांची दुरस्ती न केल्यास मोठी दुर्घटना ही होऊ शकते. तरी पुरात्व विभागाने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करुन घ्यावी, अन्यथा मनसेच्या वतीने कुठल्याही प्रकारची सूचना न देता मोठे आंदोलन करण्यात येईल. कुठल्याही प्रकारची अनूचित घटना घडल्यास पुरात्व विभाग जबाबदार राहिल, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी निवेदन देताना अशोक कुटे, अक्षय जाचक, अविनाश जांभुळकर, विजय भानुसघरे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थीत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.