वर्षभरापासून फरार दोन सराईतांना बेड्या

दरोडा प्रतिबंधक विभागाची कारवाई

पिंपरी – गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई शुक्रवार दि. 19 जुलै रोजी दरोडा प्रतिबंधक विभागाने निगडी येथे केली. लखन उर्फ विकास कैलास सातव (वय-22, रा.दळवी नगर ओटास्किम, निगडी) व नितीन महावीर चंदनशिवे (वय-23, रा. रुपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

दरोडा प्रतिबंधक विभागाचे पथक निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेत असताना, त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलिसांना वर्षभरापासून गुंगारा देवून फिरणारे दोन सराईत गुन्हेगार निगडी येथील चिकन चौकात थांबले आहेत. माहिती मिळताच पथकाच्या कर्मचाऱ्यांनी निगडी येथील चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोघांवरही निगडी व सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षभरापासून विविध गुन्ह्यात पोलीस या आरोपींना शोधत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)