‘तुला पाहते रे’नंतर गायत्री दातार करणार रंगभूमीवर पदार्पण

मुंबई : तुला पाहते रेने या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. त्यातच इशाची भूमिका वठविणाऱ्या गायत्री दातारला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विशेष म्हणजे आता मालिका संपल्यानंतर गायत्री लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. गायत्री लवकरच राहुल भंडारे निर्मित ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नव्या नाटकात झळकणार आहे.

अद्वैत थिएटर्सचे ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे बालनाट्य असून या नाटकाच्या माध्यमातून गायत्री रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने राहुल भंडारे, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि चिन्मय मांडलेकर एकत्र आले आहेत. या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे यांनी केली असून दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत आहेत. तर रत्नाकर मतकरी यांनी हे नाटकं लिहिलं आहे. निम्मा शिम्मा राक्षसमध्ये गायत्री दातार मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे रंगमंचावर झळकणार आहेत. त्याचबरोबर इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेत गाजलेले तरुण चेहरे नाटकात असणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)