पिंपरी – लग्न करणार असल्याचे सांगत व जिवे मारण्याची धमकी देऊन 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार चिंचवड येथे घडला आहे. या प्रकरणी अनिल आडसुळ रा. बारलोणी (कुर्डवाडी) ता. माढा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपीने लग्नाचे अमिष दाखवित तसेच माझ्याशी लग्न कर अशी धमकी देऊन अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.