कामगाराला मारहाण करत केली पैशांची मागणी

पिंपरी – मॉलमध्ये खरेदीच्या बहाण्याने येवून तेथील कामगाराला मारहाण केली व दहशत पसरवण्याच्या इराद्याने मॉल मालकाकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. ही घटना नुकतीच चिंचवड येथील तुलशीदास द मॉल या ठिकाणी घडली. याप्रकरणी हरेश घनशामदास डोरवानी (वय-45 रा. हेमु कॉलनी गार्डन, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ कपाळ्या राजु काळे (वय-28 रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड) व इतर यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादीच्या मॉलमध्ये आरोपी आपल्या साथीदारासह खरेदीच्या बहाण्याने आला व दहशत निर्माण करुन मॉलमधील कामगाराला मारहाण केली. खरेदीसाठी आलेल्या इतर लोकांनाही जिवे मारण्याची धमकी देत दहशत माजविली. मॉलमध्ये दहशत निर्माण करुन फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.