नगर: नगर दौंड रोडवरील हनुमान नगर येथील ओम साई ट्रेडर्स हार्डवेअरचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील प्लम्बिंगचे सुमारे 40 हजारांचे विविध प्रकारचे साहित्य लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. याबाबत अक्षय बलभीम टकले (रा.वाळकी, ता.नगर) यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, वाळकी येथील रहीवाशी अक्षय टकले यांचे नगर दौंड रोडवरील हनुमान नगर येथे ओम साई ट्रेडर्स नावाने हार्डवेअर, प्लंम्बिचे साहित्य विक्री करण्याचे दुकान आहे.
शनिवारी नेहमीप्रमाणे टकले हे रात्री दुकान बंद करून घरी गेले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून नळकॉक, नॉनरिटन वॉल, वॉशिंग मशिन कॉक, सिंककॉक, बीबकॉक, स्पेंडल, वॉलमिक्सर, शॉवर, हाफटन, पिरकॉकू आदी प्रकारचे विविध 40 हजारांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी अक्षय टकले यांनी कोतवाली पोलिसांत अज्ञात चोरांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोहेकॉ इखे हे करत आहेत.