तरुणाची सोनसाखळी हिसकावली

पिंपरी, दि.20 (प्रतिनिधी) -तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना आकुर्डी प्राधिकरण परिसरात गुरुवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दर्शन नितीन छाजेड (वय-19 रा. आकुर्डी) याने फिर्याद दिली असून दुचाकीवरूल अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हा आकुर्डी येथील रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभारला असताना त्याच्या पाठीमागून पांढऱ्या दुचाकीवरून आले व त्यांनी गळ्यातील चैन हिसकावून नेली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.