पिंपरी – हायड्रॉलिक मशीनवर काम करताना एका कामगाराची बोटे कापली गेली. कामगारावर उपचार करताना घटनेची माहिती पोलिसांना न देता डॉक्टरने कागदपत्रे बदलली. हा प्रकार पवारवस्ती, चिखली येथील मेहर ऑटोपार्ट इंडस्ट्रीज येथे 12 सप्टेंबर आणि त्यापूर्वी घडली.
रवींद्र बाबुराम जयस्वाल (वय 20, रा. पवारवस्ती, चिखली) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी 10 ऑक्टोबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहर ऑटोपार्ट इंडस्ट्रीजचे मालक दीपक तिवारी, मॅनेजर प्रेमसिंग, सुपरवायजर परवेज, विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना मशीनचे कोणते ही ज्ञान नसताना प्रेस मशीन वर ऑपरेटिंगचे काम दिले. यावेळी सुरक्षेचे साहित्य व सुविधा देण्यात आल्या नाहीत. काम करत असताना फिर्यादी यांच्या हातावर प्रेस मशीनचे डाय पडून फिर्यादीच्या हाताची तीन बोटे कापली गेली.
यावेळी उपचारासाठी दवाखान्यात नेले असता विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर उपचाराचे कागदपत्रे कंपनी मालकाला दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक व्यवस्थापक सुपरवायझर व संबंधित डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.