पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 114 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 9 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहराबाहेरील 8 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरामध्ये 94639 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 107 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 7 जणांना करोनाची लागण झाली. तसेच आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 1 व शहराबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील निगडी येथील 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील शिवणे, शिरुर, नऱ्हे, अम्रावती, हिंजवडी, मुंबई, शिरोली व पेरणे येथील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिवणे येथील 36 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.
आज दिवसभरात 106 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91382 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1980 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. अद्याप 1678 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत पालिकेच्या रुग्णालयामध्ये 760 तर गृह विलगीकरणात 776 रुग्ण उपचार घेत आहेत.