पिंपरी – कौटुंबिक कारणातून चुलत भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर येथे शनिवार (दि. 22) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
ऋतुजा भोंडवे (रा. दळवीनगर चिंचवड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी संतोष रोहिदास भोंडवे (वय-25 रा. रावेत) याला अटक केली आहे. ऋतुजा व संतोष यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता. यातूनच संतोषने ऋतुजाचा खून केला.