पिंपरी – लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी तिचे विवस्त्र फोटो काढले. त्या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत महिलेकडून पाच लाख रुपये देखील घेतले. ही घटना पिंपरी, लोणावळा, गोवा आणि चिखली येथे घडली.
अनिल मॅथ्यू आंचरील (वय 26, रा. रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि.9) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 एप्रिल 2019 ते जून 2021 या कालावधीमध्ये पिंपरी, लोणावळा, गोवा आणि चिखली येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांचे विवस्त्र फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपये देखील घेतले.