बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन ; कर्करोगाविरोधातील झुंज अपयशी

Sushil Kumar Modi passes away । भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगामुळे निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशील कुमार मोदी यांचे पार्थिव आवाज त्यांच्या पाटणाच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा Sushil Kumar Modi passes away ।
सुशील मोदी यांनी एप्रिल महिन्यात त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली होती. तसेच प्रकृतीच्या कारणामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. सुशील कुमार मोदी हे बिहारमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बरीच वर्ष विद्यार्थी राजकारणात काम केलं होतं. आणीबाणीच्या काळातही त्यांनी मोठा लढा दिला होता.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली.त्यांनी, “बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांचे निधन झालं आहे. बिहार भाजपाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”
पार्टी में अपने मूल्यवान सहयोगी और दशकों से मेरे मित्र रहे सुशील मोदी जी के असामयिक निधन से अत्यंत दुख हुआ है। बिहार में भाजपा के उत्थान और उसकी सफलताओं के पीछे उनका अमूल्य योगदान रहा है। आपातकाल का पुरजोर विरोध करते हुए, उन्होंने छात्र राजनीति से अपनी एक अलग पहचान बनाई थी। वे… pic.twitter.com/160Bfbt72n
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2024
मोदींसह इतर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली Sushil Kumar Modi passes away ।
दरम्यान, त्यांच्या निधानानंतर पंतप्रधान मोदींसह इतर राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी, “पक्षातील माझे सहकारी आणि मित्र सुशील मोदी यांच्या आकस्मिक निधनाने दुःख झाले. बिहारमध्ये भाजपाचा उदय आणि यशात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाशी संबंधित विषयांची त्यांची समज खूप खोल होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!” असं म्हटले.





