- 158 जणांना करोनाची लागण
- एकाचा मृत्यू , 25 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – शहरात पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा हळूहळू करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज दिवसभरामध्ये 158 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 1 लाख 1 हजार 768 जणांना करोनाची लागण झाली.
शहरामध्ये दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 5 तारखेला अवघ्या 92 रुग्णांची नोंद झाली होती. तर सोमवारी (दि.8) 76 बाधित आढळले होते. त्यानंतर आठवड्यामध्ये अनुक्रमे 103, 137, 133, 117 व 132 रुग्णांची नोंद झाली होती. आज शहरातील करोनाबाधित रुग्णांनी दीडशेचा आकडा ओलांडला. आज शहरामध्ये 158 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 150 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 8 रुग्णांला आज करोनाची लागण झाली. दिवसभरात शहराबाहेरील सोलापूर येथील एका 73 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2597 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1827 तर शहराबाहेरील 770 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 97965 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2671 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 861 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 705 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1271 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1976 इतकी आहे.