- 2385 नवीन बाधित : 2376 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील कररोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख उंचावतच आहे. आज शहरामध्ये आणखी 55 जणांचा मृत्यू झाला. तर नवीन 2385 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 973 वर पोहचली आहे. तर 3567 जणांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 21) शहरात 2385 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला नाही. आजपर्यंत शहरातील 1 लाख 90 हजार 973 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच आज आणखी 55 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 32 तर शहराबाहेरील 23 जणांचा समावेश आहे.
शहरातील चिंचवड, मोशी, चऱ्होली, चिखली, सांगवी, मोरवाडी, तळवडे, रहाटणी, रावेत, पिंपळे सौदागर, दिघी, निगडी, नेहरुनगर, काळेवाडी येथील 32 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील मंचर, जुन्नर, धाणोरी, चंदणनगर, शिक्रापूर, खेड, पर्वतीगाव, बालेवाडी, खडकवासला, आळंदी, देहूगाव येथील 23 जणांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरामध्ये 2376 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 246 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 9873 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 5842 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 8171 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15,080 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 23,251 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 8077 जणांना लस देण्यात आली.