पिंपरी – पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी व आकुर्डी येथील लोकन्यालायात एकूण 1128 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दोन्ही ठिकाणचा मिळून
4.95 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे
अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर होते. या वेळी पिंपरी न्यायालायात विविध प्रकारचे 204 खटले निकाली काढण्यात आले. त्यात 2 कोटी 70 लाख 44 हजार 149 रुपये महसूल जमा झाला व आकुर्डी येथील न्यायालयात येथे 924 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 2 कोटी 25 लाख 46 हजार 460 रुपये असा एकूण 4.95 कोटीचा महसूल जमा झाला. प्रमुख उपस्थिती ऍड. शोभा कड यांची होती. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी यांचा सत्कार करण्यात आला. लोकन्यायालय करिता पॅनल ऍडव्होकेट म्हणून ऍड. निलम जाधव व ऍड. अक्षय भालेराव तसेच आकुर्डी येथील न्यायालयात ऍड. सुषमा पाटील यांनी पाहिले.
यावेळी महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे, ऑडिटर ऍड. राजेश रणपिसे, सदस्य ऍड. स्वप्नील वाळुंज, ऍड. सौरभ जगताप, ऍड. प्रशांत बचुटे, ऍड. अक्षय केदार उपस्थित होते. या वेळी बालाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व सादर केले. प्राचार्या डॉ. मधूश्री जोशी उपस्थित होत्या. पथनाट्याचे संयोजन ऍड. मंगेश खराबे यांनी केले. एसएनबीपी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड×ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. सुदाम साने, ऍड. सतीश गोरडे, ऍड. सुनील कडूस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे यांनी केले. आभार सचिव ऍड. प्रशांत बचुटे यांनी मानले. नियोजन पिंपरी चिंचवड ऍडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्षा ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड गणेश शिंदे यांनी केले.
दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 89 चे तरतुदीनुसार प्रलंबित खटल्यांची संख्या कमी व्हावी व न्याय मिळणे सुकर व्हावे हयाकरीता उच्च न्यायालयातर्फे मुंबई व सर्व जिल्हा न्यायालयामध्ये मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
-×ऍड. जयश्री कुटे, उपाध्यक्षा, पिंपरी चिंचवड ऍड. बार असोसिएशन.
समाजात आजही मोठ्या प्रमाणावर कायद्याविषयी अनभिज्ञता असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच विधी महाविद्यालये कायद्यांविषयीची जनजागृती करण्याचे मोलाचे काम करतात.
-ऍड. मंगेश खराबे, सभासद, पिंपरी चिंचवड ऍड. बार असोसिएशन.