मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. वरुणच्या हैदराबाद येथील घरी हा साखरपुडा पार पडला. यावेळी अल्लू अर्जुनसह अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लावण्या आणि वरुणने सोशल मीडियावर त्यांचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वरुणने इनस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले की, “माझे प्रेम मला मिळाले”. तर लावण्याने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, “2016 मध्ये मला माझे प्रेम मिळाले आहे.” गेल्या काही दिवसांपासून लावण्या आणि वरुणच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. अखेर त्यांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. तसेच लावण्याने तिच्या पोस्टमधून 2016 पासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांनी दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. तो मिस्टर आणि अंत्रिक्षम 9000 KMPH मध्ये दिसला होता. याआधीही हे दोन्ही स्टार्स अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. दरम्यान, लावण्याने ‘अंदाला राक्षसी’ या सिनेमातून 2012 साली सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 2017 साली आलेल्या ‘मिस्टर’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण आणि लावण्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आता त्यांचा साखरपुडा पार पडला.
लावण्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. या सोहळ्याला अभिनेता अल्लू अर्जुन, चिरंजीवी, राम चरण यासारख्या कलाकार उपस्थित होते.