#PhotoGallery: रेल्वे सुरक्षा फोर्सच्या मैदानावर जवानांकडून प्रात्यक्षिके

पुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वे सुरक्षा फोर्सच्या मैदानावर मंडळ रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांच्या हस्ते झेंडावदंन करण्यात आले. यावेळी मंडल सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी उपस्थित होते. रेल्वे प्रबंधकांना आरपीएफच्या दोन पथक तसेच श्वान पथक तसेच नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

यानंतर के 9 डॉग ट्रेनिंग स्कुलच्या श्वानांनी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी उपनिरीक्षक अजित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रात्यक्षिक सादर केले. तसेच आरपीएफच्या जवानांनी नेत्रदीपक असे सायलेंटड्रिल सादर केले. नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीलम चंद्रा, सहर्ष बाजपेयी यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डॉ.तुशाबा शिंदे, विभागीय सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here