#INDvNZ 2nd T20 : प्रजासत्ताकदिनी टीम इंडियाचा न्यूझीलंडमध्ये विजयी झेंडा

आॅकलंड : सलामीवीर लोकेश राहुल आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यर यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. लोकेश राहुल सामन्याचा मानकरी ठरला.

https://twitter.com/BCCI/status/1221374921164541952?s=19

विजयासाठीचे १३३ धावांचे आव्हान भारताने १७.३ षटकात ३ बाद १३५ धावा करत पूर्ण केले. रोहित शर्मा ८ आणि कर्णधार विराट कोहली ११ धावांवर झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी संघाची धुरा हाती घेत तिस-या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी करत भारतीय संघास विजयासमीप नेले. श्रेयस अयरने ३३ चेंडूत (१ चौकार व ३ षटकार) ४४ धावांची खेळी केली. तर लोकेश राहुलने ५० चेंडूत (३ चौकार व २ षटकार) नाबाद ५७ आणि शिवम दुबेने ४ चेंडूत(१ षटकार)नाबाद ८ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून टीम साउदीने २ तर ईश सोढीने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीत मार्टिन गप्टिलने ३३(२०), काॅलिन मुनरो २६(२५), केन विल्यमसनने १४(२०), ग्रैंडहोमने ३(५), राॅस टेलरने १८(२४) आणि टिम सीफर्टंने नाबाद ३३(२६) धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजाने ४ षटकांत १८ धावा देत सर्वाधिक २ गडी बाद केले. तर शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. युजवेंद्र चहल व मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.