बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानही चित्रपटसृष्टीपासून कोसो दूर आहे. परंतु सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. इरा ही आपल्या फोटोशूटमुळे कायम प्रसिद्धिच्या झोतात असते. पुन्हा एकदा इराचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटो मिस्टर परफेक्शनिस्टची मुलगी एका वेगवेगळयाच अंदाजात झळकली आहे. या फोटोतील तिची स्टाईल आणि अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.
इरा खानच्या फॅन क्लबने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रिंटेड गाउनमध्ये इरा खूपच सुंदर अशी दिसत आहे. यात तिने खूपच भडक असे ड्रेसिंग केले आहे. यावर चाहत्यांनी अनेक कॅमेंट करत तिची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, बॉलीवुडमधील अन्य स्टार किडस्प्रमाणे आमिर खानची मुलगी इरा खान अभिनय नव्हे, तर डायरेक्शनमध्ये आपले करियर करू इच्छित आहे. यासाठी तिने पूर्ण तयारी देखील केली आहे. गतवर्षीच्या अखेरीस डिसेंबरमध्ये तिचे पहिले नाटक “मेडिया’ प्रदर्शित झाले होते. यात माजी क्रिकेटपटू युवराज सिंहची पत्नी, अभिनेत्री हेजल किचने मुख्य भूमिका साकारली होती.