#PhotoGallery: “प्रभात ग्रीन गणेशा” कार्यशाळेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा!

पुणे – महाराष्ट्रासह देश विदेशातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असणारा “गणेशोत्सव’ कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिकतेचे प्रतिबंब आहे. बदलत्या आधुनिक काळात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. मात्र या नव्या स्वरुपामुळे पर्यावरणीय प्रश्‍नांमध्ये भर पडत आहे. त्यातील महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे घरोघरी विराजमान होणारी “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची गणेशाची मूर्ती आणि ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे पाण्याचे, नदीचे प्रदूषण. ही समस्या टाळण्यासाठी दै. “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि.30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. दरम्यान, न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोड या शाळेत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेचा आज (दि.27) दुसरा दिवस होता. त्याचेच काही क्षणचित्रे…

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)