VIDEO: “प्रभात ग्रीन गणेशा” कार्यशाळेला सुरवात; विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा! (भाग-१)

कर्वेनगरमधील “मिलेनियम नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे – महाराष्ट्रासह देश विदेशातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असणारा “गणेशोत्सव’ कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिकतेचे प्रतिबंब आहे. बदलत्या आधुनिक काळात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. मात्र या नव्या स्वरुपामुळे पर्यावरणीय प्रश्‍नांमध्ये भर पडत आहे. त्यातील महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे घरोघरी विराजमान होणारी “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ची गणेशाची मूर्ती आणि ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे पाण्याचे, नदीचे प्रदूषण. ही समस्या टाळण्यासाठी दै. “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि.30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेचा सोमवारी कर्वेनगरमधील “मिलेनियम नॅशनल स्कूल’मध्ये शुभारंभ झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाहा फोटो : विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा!

साहजिकच या बदलांची सुरूवात ही विद्यार्थीदशेत होणे आवश्‍यक आहे. या संस्कारक्षम वयात पर्यावरण समतोलाची जाणीव झाली तर त्याचा उपयोग नक्कीच पुढील आयुष्यात होऊ शकतो. त्यामुळेच यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. या कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय कमी वेळेत, मोजक्‍या साहित्यांचा वापर करून श्रीगणेशाची सुबक मूर्ती कशी तयार करावी, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी “सिद्धीविनायक ग्रुप’, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील “पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स’ आणि “महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि.’, तसेच “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’, “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ’ आणि “पुणे महानगरपालिका’ यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)