राज्यातील फार्मासिस्टना कोविड योद्धा मणून लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकता मिळावी
पुणे,दि. मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रतिनिधींना कोविड योध्दा म्हणून केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
परंतु औषध विभागामध्ये सेवा देणाऱ्या फार्मासिस्टना केंद्र व राज्य सरकारने यातून वगळले वगळले आहे. त्यामुळे भारतातील नऊ लाख औषध व्यावसायिक व सेवा देणारे लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकतेने वंचित राहिलेले आहेत.
ही बाब अन्यायकारक असून फार्मासिस्टना कोविड योध्दा म्हणून लसीकरण सेवेत समावून घ्यावे अशी मागणी भारती विद्यापीठ इंन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी माजी विद्याथी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.
मागील एक वर्षापासून कार्मासिस्टदेखील कारोना नियंत्रणाकरिता काम करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याते औषध निर्माण करणे, औषधे विक्री, औषध वितरण , औषध समुपदेशन मध्ये अहोरात्र सेवा देत आहे. याशिवाय गरजूता मोफत औषधसेवा, मोफत सॅनीटायझर
मास्क वाटप तसेच दवाखान्यामध्ये पेशंटला दाखल करण्याकरिता बेड उपलब्धतेची माहिती.
रक्तपुरवठा, प्लाझमादान, ऑक्सिजन पुरवठयासाठी आजही झोकून देऊन काम करत आहेत. दोनशेपेक्षा अधिक फार्मासिस्टला कोरोनामुळे मृत्युला सामोरे जावे लागले आहे. तसेच हजारो फार्मासिस्ट कुटुंबियांना आजाराने बाधित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम फार्मासिस्टचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
यामुळे महाराष्ट्रातील तमाम फार्मासिस्ट बंधूता आपण कोविड योध्दा म्हणून मान्यता केऊन त्यांना लसीकरण प्रक्रियेत तात्काळ प्राथमिकता यावी. फार्मासिस्टच्या सेवेप्रति होणारा अन्याय दूर करावा असे पत्रात म्हटले आहे.