नवी दिल्ली – देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. मृत्यूंची संख्या कमी होतांना दिसत नाही.
याचदरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी म्हंटले आहे की,’लस घेण्यासाठी मुस्लिम समुदाय पुढे येत नाही. मुस्लीम समाजातील लोक लसीकरणापासून दूर राहतात कारण त्यांना लसीबाबत अनेकी शंका आहे. त्यांच्या मनात लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत. असं म्हणत रावत यांनी आपलं रोकठोक मत मांडलं.
दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी यापूर्वीही अजबच विधान केले होते. कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असे धक्कादायक विधान रावत यांनी केले आहे. त्यांच्या या अजब विधानाने एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा मुस्लीम समाजातील लोक लसीकरणापासून दूर राहतात त्यांचा या विधानमुळे सध्या सोशलवर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.