पेठ (प्रतिनिधी) : पेठ (ता. आंबेगाव) येथे आज पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरून नाशिकला जाताना महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर 15 मिनिटे थांबून धावती भेट दिली. सातगाव पठार भागातील अनेक समस्या समजून घेतल्या.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मुंबईतील जुने मित्र माधवराव रामदुलार धुमाळ हे पेठ गावात आहेत. .त्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वर जुने मित्र यांना फोन करून रोड वर बोलाविले व धुमाळ यांची आवर्जून भेट घेतली. तसेच याप्रसंगी गावातील कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गावाची आपुलकीने चौकशी केली.
याप्रसंगी श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालक मंगेश पवळे, पेठ विकास सोसायटी चेअरमन सुखदेव बुट्टे , शामराव धुमाळ, ,भानुदास धुमाळ आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.