अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यात दि. 1 जुलै ते दि. 9 जुलै पर्यंत 859 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 8 लाख 87 हजार 560 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 8 लाख 87 हजार 560 आणि असे एकूण दि.1 एप्रिल ते दि. 9 जुलै या कालावधीत 98 लाख 67 हजार 89 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.