नवी दिल्ली : सर्कस आणि अन्य ठिकाणी हत्तीचा वापर करण्यास मनाई करावी अशी मागणी पिपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल (पेटा) या संस्थेने केली आहे.
मत्स्य आणि पशूसंवर्धन खात्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना पेटाने पत्र पाठवले आहे. त्यात हत्तीचा समावेश वन्य प्राण्यांमध्ये करावा. त्यामुळे त्याला प्रशिक्षण देऊन त्याचा केला जाणारा छळ थांबेल, असे त्यात म्हटले आहे.
1998 मध्ये केंद्र सरकारने अस्वल, माकड, वाघ, चित्ते आणि सिंहाचा यांना प्रशिक्षण देऊन खेळ करण्यावर भंदी घातली होती. हत्तीचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये असूनही या यादीतून हत्तीला वगळले होते.