आॅकलंड : सलामीवीर लोकेश राहुल (५६), कर्णधार विराट कोहली (४५) आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यरच्या (५८) तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर पहिल्या टी-२० सामन्यात ६ विकेटनी शानदार विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रेयस अय्यर सामन्याचा मानकरी ठरला.
Shreyas Iyer finishes things off in style with a mighty six!
India win the first #NZvIND T20I by six wickets.
SCORECARD: https://t.co/6dq9gApGSs pic.twitter.com/9lV5uXXE1W
— ICC (@ICC) January 24, 2020
विजयासाठीचे २०४ धावांचे आव्हान भारतीय संघाने १९ षटकात ४ बाद २०४ धावा करत पूर्ण केले. भारताकडून फलंदाजीत लोकेश राहुलने २७ चेंडूत (४ चौकार व ३ षटकार) ५६, कर्णधार विराट कोहलीने ३२ चेंडूत (३ चौकार व १ षटकार) ४५ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने २९ चेंडूत (५ चौकार व ३ षटकार) नाबाद ५८ आणि मनीष पांडेने १२ चेंडूत (१ षटकार) नाबाद १४ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याव्यतिरिक्त रोहित शर्माने ७ आणि शिवम दुबनेे १३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ईश सोढीने ४ षटकात ३६ धावा देत २ तर मिचेल सॅटनर आणि ब्लेयर टिकनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Southee takes a good catch off Sodhi's bowling as India lose their second wicket.
It's a big one of KL Rahul who falls after scoring a terrific 27-ball 56.#NZvIND pic.twitter.com/9307hyP0Xy
— ICC (@ICC) January 24, 2020
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या होत्या.
Innings Break!
Half-centuries from Munro, Williamson and Taylor propel New Zealand to a total of 203/5 after 20 overs.#TeamIndia chase coming up shortly.
Live – https://t.co/5NdtfFJOd8 #NZvIND pic.twitter.com/G0DEqeJGZG
— BCCI (@BCCI) January 24, 2020
न्यूझीलंडकडून काॅलिन मुनरो याने ४२ चेंडूत (६ चौकार व २ षटकार) ५९, केन विलियमसनने २६ चेंडूत (४ चौकार व ४ षटकार) ५१, राॅस टेलरने २७ चेंडूत (३ चौकार व ३ षटकार) नाबाद ५४ आणि मार्टिन गप्टिलने १९ चेंडूत (४ चौकार व १ षटकार) ३० धावांची खेळी केली.
Fifty and out!
Kane Williamson falls after scoring a blazing 26-ball 51. #NZvIND pic.twitter.com/3z5QQ5B3G0
— ICC (@ICC) January 24, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ४ षटकात ३१ धावा देत १, युझवेंद्र चहलने ४ षटकांत ३२ धावा देत १, शार्दुल ठाकूरने ३ षटकात ४४ धावा देत १, शिवम दुबेने ३ षटकात २४ धावा देत १ आणि रविंद्र जडेजाने २ षटकात १८ धावा देत १ गडी बाद केला. तर मोहमद शम्मीला एकही गडी बाद करता आला नाही, त्यानी ४ षटकात ५३ धावा दिल्या.