राजगुरूनगर (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील सर्व दैनदिन आस्थापना सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत सुरु राहणार असून महामार्गावरील सर्व हाँटेल्स सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रांत संजय तेली यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील भाविक, पर्यटक, यात्रेकरुना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांसाठी परतीचा आणि बाहेरील जिल्ह्यातुन परवानगीने प्रवास करणा-यासाठी महामार्गावरील सर्व हाँटेल, ढाबे, उपहारगृह सुरु करुन अन्न पदार्थ पँकबंद पार्सल स्वरुपात देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महामार्गावरील हाँटेल्स, ढाबे हे सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत सुरु ठेऊन अत्यावश्यक सेवेतील माल वहातुक,जड वाहन चालकांना आणि परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांसाठी हाँटेल व्यवस्थापनाने योग्य ती आवश्यक गरजेची सेवा उपलब्ध करुन करोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या अटी , नियमांचे काटेकोर पालन करुन अन्न पदार्थ पार्सल सेवा देण्याची परवानगी दिली आहे. तसेच चहा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र महामार्गावरील ढाबे, हॉटेलस जवळील आणि सर्वच ठिकाणच्या पानटपऱ्या सुरु ठेवता येणार नाहीत अशी अट घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लघंन केल्याचे आढळुन आल्यास, हाँटेल बंद करुन गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रांत संजय तेली यांनी दिला आहे.
खेड तालुक्यात ३ मे नंतर लाँकडाऊन नंतर आपत्ती व्यवस्थापनेनुसार ४ मे पासुन राजगुरूनगर, आळंदी, चाकण शहरासह सर्वत्र परमीट रुम, चहा विक्रेते, हाँटेल्स, माँल, आदि वगळुन सर्व दैनदिन व्यवहारातील आस्थापनांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यत सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गेले तीन दिवस सर्व आस्थापनांनी आदेश पाळुन अंंमलात आणल्याने दुपारी तीन नंतर वाहनासह, नागरीकांची वर्दळ अगदी तुरळक दिसत असल्याचे दिसुन आले होते. नागरीकांनीही या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले होते.
राज्य शासनाच्या आदेशानुसार आता खेड तालुक्यात सर्व आस्थापना दररोज सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत सुरु राहणार असल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले