नगर – महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेचे शुक्रवारी (दि.9) दुपारी एक वाजता झुम ऍपद्वारे नुतन सभापती मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.
नगरसेवक निधितून विद्युत साहित्य खरेदी करणे, बूथ कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्याच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. विद्युत विभांतर्गत पथदिवे देखभाल दुरुस्तीकरीता नगरसेवक स्वेच्छा निधीमधून विद्युत साहित्य खरेदी करणे, कोविड सेंटर असलेल्या बूथ हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याच्या अत्यावश्यक दुरुस्तीबाबतचा ऑफिस रिपोर्ट अवलोकनार्थ स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर बुरुडगाव येथे पाच केएलडी क्षमतेचा इपीटी दुरुस्त करणे आदी महत्वाच्या विषयांसह पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत विभाग, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील मानधनावरील कर्मचाऱ्यांना करारबध्द करुन पुनरनियुक्ती देणे आदी विषय सभेपुढे आहेत.