प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा

राज्य शासन सकारात्मक असल्याची उदय सामंत यांची ग्वाही

पुणे – राज्यातील प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच होणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी सेट-नेट पात्र उमेदवारांना पहिले प्राधान्य राहील. त्यानंतर अन्य उमेदवारांचा विचार होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. करोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली. त्यामुळे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडली होती. शासनाने ही बंदी उठवावी, अशी मागणी होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर उदय सामंत म्हणाले, सीएचबी पद भरतीसाठी लवकरच जाहिरात काढली जाईल. संबंधित विषयाच्या सेट-नेट पात्र प्राध्यापकांना पहिले प्राधान्य राहणार आहे.

महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्कच घ्यावे

करोना पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क घ्यावेत. डेव्हलपमेंट, जिमखाना असे शुल्क आकारू नये. अशा प्रकारचे शुल्क वसूल होत असल्यास त्यांची तक्रार करावी, अशा संस्थांवर कारवाई केली जाईल. तसेच महाविद्यालयांनी शुल्कवाढ करू, नये याबाबत निर्देश दिले आहेत. पुणे विद्यापीठाने प्रस्तावित केलेली शुल्कवाढ एका वर्षासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे संस्थांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.