राजगुरूनगर -हाथरस (उत्तर प्रदेश) घटनेच्या निषेधार्थ राजगुरूनगर येथे सोमवारी (दि. 5) संध्याकाळी पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना आणि खेड तालुका कॉंग्रेसच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅंडल मोर्चाची सुरुवात झाली. भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी अनिल जाधव, किशोर डोळस, के. डी. जाधव, ऋषिकेश डोळस, संजय गायकवाड, देवा खंडागळे, शरद थोरात, ऋषिकेश डोळस, दिनकर गायकवाड, विलास रोकडे, सोनु काळे, राहुल डोळस आदींसह शंभरावर युवकांनी या कॅंडल मार्चमध्ये सहभाग घेतला.
डोळस म्हणाले, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलीस व प्रशासनाकडून मिळालेल्या वागणुकीचा जाहिर निषेध करतो. हाथरस येथील पीडितेवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोषींना फाशी द्यावी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत तेथील प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.