मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिव सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती. या चर्चेबद्दल खुलासा करत भुजबळांनी “मै याही हुं… मै यही हुं…” म्हणत चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचित्तीं देत भाजप सेनेत प्रवेश केला आहे. भुजबळ देखील सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्च संदर्भात त्यांनी हा खुलासा केला आहे.