आरबीआय च्या विश्वासार्हतेबद्दल हे म्हणाल्या सीतारामन

पुणे: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सरकारला १.७६ लाख कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या मदतीमुळे आरबीआय ची विश्वासाहार्यता कमी होईल असे समजण्याचे काहीच कारण नाही. असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षाकडून देशात निर्माण झालेल्या आर्थिक मंदी संदर्भात टीका केली जात असून त्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

सीतारामन म्हणाल्या विमल जालना हि कमिटी आरबीआय ने स्थापन केलेली कमिटी असून त्या संदर्भात त्यांच्या ७ बैठक झाल्या नंतरच त्यांनी निधी जाहीर केला आहे. त्याचबरोबर हि आर्थिक मदत नियमानुसारच देण्यात आली असल्याने आरबीआयची विश्वासहार्यता कुठेच कमी होणार नाही. तसेच जीएसटी संदर्भात निर्णय मला एकटीला घेता येणार नाही त्यासाठी जीएसटी कौन्सिल आहे.

दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना त्या म्हणाला राहुल गांधी हे इतरांना चोर म्हणण्यातच प्रसिद्ध आहेत. त्याचे उत्तर देखील जनतेने त्यांना दिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×