#व्हिडीओ; राजू शेट्टी यांची शिखर बँक घोटाळ्यावर प्रतिक्रिया

कोल्हापूर: राज्य बँकेच्या तात्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार दिसत नाही.या गुन्ह्यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल… गुन्हा दाखल झाला याचा अर्थ आरोप सिद्ध झाला असं होत नसल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.


दरम्यान महापुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी आणि शासनाने नुकसान भरपाईचा काढलेल्या फसव्या स्वरूपाचा असून, कर्जमाफीच्या निकषात ९५ टक्के शेतकरी अपात्र ठरत असतील तर हा निर्णय कुणासाठी आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आदेशा विरोधात जन आक्रोश मोर्चाच आयोजन केलेल आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असून मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच पीक विमा संदर्भात देखील फसवणूक करण्यात आली असल्याचे शेट्टी म्हणाले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी शिखर बँक घोटाळा संदर्भात विचारणा केली असता प्रामाणिकपणानं आणि निपक्षपाती पणाने तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास करावा अस म्हणत जे दोषी असतील त्यांच्यावर ती कारवाई होईल अस त्यांनी म्हटले आहे. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे 76 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यांमध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिय दिली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, राज्य बँकेच्या तात्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे एकदाच काय ते दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. बँकेत राज्य बँकेत सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार झालेला दिसत नाही अस सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयानं गुन्हा दाखल करा असे दिले असले तरी तपास यंत्रणांनी निपक्षती तपास करणं गरजेचं आहे. यामुळं एकदाच दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल. गुन्हा दाखल झाला याचा अर्थ आरोप सिद्ध झाला असं होत नाही प्रामाणिकपणानं आणि निपक्षपाती पणाने तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास करावा जे दोषी असतील त्यांच्यावर ती कारवाई होईल.

जे त्या काळात बँकेचे संचालक होते, त्या सर्वांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलेल आहे. परंतु प्रत्यक्षात कोणाच्या आदेशामुळे हे झालेला आहे किंवा कुणामुळे हा गैरव्यवहार झालेला आहे हे तपासात बाहेर येईलच. परंतु हा पैसा जनतेचा आहे आणि राज्य बँक ही ही राज्याची शिखर बँक आहे. त्यामुळं पक्षीय लेबल लावायचं काही कारण नाही अस शेट्टी यांनी म्हटलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)