शिरूर – वडगाव रासाई, मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात पुकारलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीच्या वतीने जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
वडगाव रासाई-मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील वडगाव रासाई, कुरुळी, नागरगाव, आंधळगाव, कोळगाव, डोळस, निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळखुटी, सादलगाव, इनामगाव, मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, तांदळी येथे पुकारलेल्या जनता कर्फ्यूमुळे रस्ते ओस पडले होते.
या कार्यासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचेही आभार मानण्यात आले. शिरूर पंचक्रोशीतील सरदवाडी ग्रामपंचायत, शिरूर रामलिंग ग्रामपंचायत, कर्डिलेवाडी ग्रामपंचायत, गोलेगाव ग्रामपंचायत, तर्डोबावाडी ग्रामपंचायत यांनी एक दिवसाचा कर्फ्यू पाळला.