IPL 2024 (PBKS vs RR Match 27) : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. सॅम करनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. रोमहर्षक लढतीत राजस्थानने अखेरच्या षटकात विजयाची नोंद केली.अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सने मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला.
राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने संथ सुरुवात करूनही 19.5 षटकांत 158 धावा करताना 7 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर. या फलंदाजाने शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी केली. शिमरॉन हेटमायरनं 10 चेंडूत नाबाद 27 धावा करून सामना पुर्णपणे फिरवला आणि संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार मारले.
याव्यतिरिक्त रियान परागने 23 धावा केल्या. संजू सॅमसनने 18 धावांची खेळी केली. यशस्वीने 39 धावा केल्या. तनुष कोटियनने 24 धावा केल्या.पंजाबकडून गोलंदाजी करताना रबाडा आणि करणने प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप, लिव्हिंगस्टोन आणि हर्षलने प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित षटकांमध्ये 8 बाद 147 धावा केल्या. यादरम्यान आशुतोष शर्माने 16 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. लिव्हिंगस्टोनने 21 धावा केल्या. जितेश शर्माने 24 चेंडूत 29 धावा केल्या. अथर्व आणि बेअरस्टो प्रत्येकी 15-15 धावा करून बाद झाले. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. बोल्ट, सेन आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.