PBKS vs DC : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतला. दिल्लीची सुरुवात गडगडल्यानंतर सर्वांचं लक्ष असलेल्या पंतला देखील फार वेळ मैदानात तग धरून थांबता आले नाही. दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 174 रन्स केले. | PBKS vs DC
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या 20 व्या षटकात 25 धावा दिल्या.
त्याने 10 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या. पोरेलने 20 व्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर कुलदीप दोन धावा काढून धावबाद झाला.आता पंजाबच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. | PBKS vs DC
बऱ्याच महिन्यांनी मैदानात उतरणाऱ्या पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र ऋषभ पंत 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. | PBKS vs DC
अशी आहे प्लेयिंग इलेव्हन
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग. प्रभाव पर्याय: रिले रुसो, प्रभसिमरन सिंग, तान्या थियागराजन, हरप्रीत सिंग, विद्वत कविरप्पा.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा. प्रभाव पर्याय: अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, जेक फ्रेझर, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे