मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर पाकिस्तानच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला होता. त्यालाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा देशापेक्षा पाकिस्तानलाच फायदा होतो याचे भान त्यांनी ठेवावे. तसेच मतांसाठी पवारांनी पाकिस्तानविषयी वक्तव्य करू नये असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
साताऱ्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीकास्त्र उगारले. पवार हे राजकारणातील बडे नेते आहेत त्यांनी आपल्या वक्तव्याचा कधी आणि कशासाठी वापर करावा याचे त्यांनी भान ठेवावे. तसेच काश्मीर प्रश्नावरून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात वापर करून घेतला. तसेच पवारांच्या वक्तव्याचा पाकिस्तान उपयोग करून घेईल अशी भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, पवारांनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे निवडणूका येतील आणि जातील पण त्याचा फायदा इतर देशाला होवु असेही त्यांनी म्हटले. देशातील मुस्लिम जनतेला आपल्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मतांसाठी पवारांनी असे वक्तव्य करू नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.