जेजुरी – शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी ते मानसशास्त्र व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवस चर्चासत्राचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने केले गेले. सद्यःस्थितीतील शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनाचे घटक हा चर्चासत्राचा प्रमुख विषय होता. या चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर अरविंद बुरकुले यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी उद्घाटनाचे अध्यक्ष शांताराम पोमण सचिव (गौरव) कोलते, सहसचिव प्राचार्य डॉ. सुषमा चाफळकर उपस्थित होते. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. किशोरी ताकवले व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शिवाजी भिंताडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. भास्कर शेजवळ, डॉ. अरुण शिंदे, डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. पुंडलिक रसाळ यांची भाषणे झाली.
डॉ. शिरीष शितोळे, डॉ. दिगंबर दरेकर, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. मोहन निंबाळकर, वैशाली कुंभार, प्राचार्य सुषमा भोसले यांनी उपयोजनात्मक मते मांडली. चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष विजय कोलते, डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राजकुमार कमी यांनी आभार मानले.