शुरवीरांची यशोगाथा सांगणारे देशभक्तीपर गाणी..!

मुंबई – देशभरामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. या दिनाच्या दिवशी देश भक्तीपर गीते आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. बॉलिवूडमध्ये या शुरवीरांची यशोगाथा सांगणारे अनेक देशभक्तीपर गाणी आहेत.

ए मेरे वतन के लोगो – लता मंगेशकर यांनी युद्धानंतर गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे ऐकताना त्या वेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना देखील आपले अश्रू अनावर झाले होते. दीदींच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.

चक दे इंडिया – चक दे इंडिया या चित्रपटातील ‘चक दे इंडिया’ हे गाणे ऐकताच एक वेगळा प्रकारचा जोश निर्माण होतो. बॉलिवूड अभिनेता शारुख खान हा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतो.

ए वतन तेरे लिये – १९८६ साली प्रदर्शित झालेल्या कर्मा चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिये’ हे गाणे आपल्याला नक्कीच देशप्रेमाची आठवण करून देणारे आहे. या चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शाह, दिलीप कुमार, अनुपम खेर व श्रीदेवी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

रंग दे बसंती – आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि सोहा अली खान अशी दमदार स्टार कास्ट असलेला रंग दे बसंती या चित्रपटाची कथा ही आजच्या जमान्यातील असली तरी चित्रपटातील कथेचा संबंध हा भगत सिंग यांच्या काळाशी लावण्यात आला होता. या चित्रपटातील रंग दे बसंती हे गाणे अफलातून आहे.

संदेसे आते हे – १३ जून १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिमेवर लढणारे जवान, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबाप्रतीची ओढ उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रपटातील ‘संदेसे आते हे’ गाणे बॉर्डर वर असणाऱ्या सैनिकांची अवस्था अगदी योग्य रीतीने मांडते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.