पटेल रुग्णालय करणार 50 स्वॅब किट खरेदी

पुणे – लष्कर परिसर तसेच शहरातील इतर भागांमधील करोना संशयीत रुग्णांच्या घशातील आणि नाकातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यासाठी स्वॅब किट खरेदी करण्याची प्रक्रिया कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाने सुरू केली आहे. रुग्णालयाच्या वतीने किमान 50 स्वॅब किट खरेदी केले जाणार आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सरदार पटेल रुग्णालयात नुकताच 30 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार केला आहे, याशिवाय रुग्णालयाच्या पथकामार्फत पुणे कॅन्टोन्मेंटच्या प्रत्येक वॉर्डात घरोघरी तपासणी केली जात आहे. मात्र, अद्याप रुग्णालयाकडे स्वॅब किट उपलब्ध नसल्याने करोना संशयितांच्या घशातील व नाकातील द्रवाचे नमुने घेता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाने स्वॅब किट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

किट स्वॅब ट्रान्सफर मीडियम म्हणून काम करणार आहे. त्यामध्ये विषाणू संरक्षित राहतो. त्यानुसार, पुढील आठवड्यापासून करोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास संबंधीत रुग्णांचे स्वॅब या किटच्या माध्यमातून एनआयव्हीकडे पाठविता येणार आहेत.
– डॉ. विद्याधर गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.