रेडा – आलेगाव बुद्रुक (ता. इंदापूर) येथील शेतकरी सुनील खंकाळ यांनी लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्याने आपल्या शेतातील परिपक्व झालेली दहा टन कलिंगड गावकरी, संचारबंदीत सेवा देणाऱ्या पोलीस, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मोफत वाटप केले.
यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर सीमाबंदीवर कर्तव्य बाजावणारे पोलीस, पोलीस मित्र तसेच नागरिकांनीही कलिंगडाचा आस्वाद घेतला. येथील श्तकरी खंकाळ यांनी आपल्या एक एकर शेतात कलिंगडाचे पीक घेतले आहे, त्याला एकूण 70 हजार रुपये इतका खर्च आला.
मात्र त्या कलिंगडाला बाजार पेठ उपलब्ध नाही आणि संचार बंदीमुळे बाहेर विक्रीसाठी जाताही येत नसल्याने सागर खंकाळ या शेतकरी युवकाने सामजिक बांधीलकी जपत कलिंगडाचे मोफत वाटप केले.